आयआयटीमधील पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियंका जयस्वाल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
मात्र प्रियंकाने हे धक्कादायक पाऊल उचलण्याच्या काही तास आधीच आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी तिने मला उद्या सकाळी फोन करून लवकर झोपेतून उठव, अशी विनंतीही आपल्या आईला केली होती. असं असताना काही तासांत असं नेमकं काय झालं की प्रियंकाला आपला जीव नकोसा झाला, याबाबत गूढ निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून एमटेकचं शिक्षण घेतलं होतं. यामध्ये ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तिला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यानंतर ती जोमाने अभ्यासही करत होती. मात्र आता तिने थेट जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे
बुधवारी रात्री प्रियंका अगदी मनमोकळेपणाने आपल्या आई-वडिलांशी बोलली होती. तसंच झोपेतून उठायला उशीर होत असल्याने नाश्ता करायला उशीर होतो, त्यामुळे उद्या सकाळी ७ वाजता मला फोन करून उठव, असंही तिने आपल्या आईला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं. आयआयटी प्रशासनाने चौकशी केली असता त्यांना प्रियंका मृतावस्थेत आढळून आली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…