क्रिकेट स्पर्थेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम अर्जुन आगोणे (२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरिकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी त्याला मयत घोषित केले. ही वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील आणि सहकाऱ्यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…