ताज्याघडामोडी

‘संक्रातीला नवीन कपडे घ्या’, पतीच्या नकारानंतर पत्नीने मुलींना संपवलं, अन् मग…

संक्रांतीचा सण येतोय, हा सण देशभर साजरा केला जातो. तेलंगणामध्येही संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तिथे संक्रांतीनिमित्त नवीन कपड्यांसाठी एका महिलेने पतीकडे हट्ट धरला. पतीने आधी नव्या कपड्यांसाठी नकार दिला आणि यामुळे नाराज झालेल्या महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. तिने आपल्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली आणि गळफास लावून जीव दिला. या भयंकर घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

कामावर गेलेला पती पत्नी व मुलींसाठी नवीन कपडे घेऊन घरी परतला आणि घरात पत्नी आणि मुलींचे मृतदेह पाहून त्याला धक्का बसला. तो सुपरवायझर म्हणून काम करतो आणि त्याला पाच महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने महिलेने हे जीवघेणं पाऊल उचललंय, असं कळतंय. पैशांवरूनच पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं. पत्नीला मकर संक्रांतीच्या सणाला कपडे खरेदी करायचे होते; पण नवर्‍याकडे पैसे नव्हते. त्याने तिला कपडे नंतर घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. तरीही तिने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.

नगरकुर्नूल जिल्ह्याच्या नल्लामाला भागातल्या रामपूर पेंटा गावात ही धक्कादायक घटना घडली. या गावातला रहिवासी असलेल्या चिन्ना बयानाची दोन लग्नं झाली आहेत. त्याला दोन्ही पत्नींपासून 8 मुलं होती. तो कृष्णा नदीजवळच्या 1 बेस कॅम्पमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. त्याची एक पत्नी चिन्नागम्मा संक्रांतीच्या सणासाठी आपल्या मुली यादम्मा आणि बायम्मा यांच्यासाठी नवीन कपडे घेण्याचा हट्ट पतीकडे करत होती. चिन्ना बयानाने त्याला त्याची कठीण परिस्थिती सांगितली; पण तिने ऐकलं नाही. नंतर त्याने पत्नीला नवीन कपडे घेऊन येईन, असं वचन दिलं आणि मन्नानूर इथं कामासाठी निघून गेला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिन्नागम्माने रागाच्या भरात आपल्या दोन्ही मुली यादम्मा आणि बायम्मा यांचा गळा दाबून खून केला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. पती घरी आला असता घरात पत्नी व मुलींचे मृतदेह पाहून त्याला धक्काच बसला. त्याने मन्नानूर इथून कपडे खरेदी केले होते आणि तो घरी आला होता; पण घरात मात्र या तिघींचे मृतदेह दिसले. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटना उघडकीस आल्यावर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. घरातलं हे भयंकर दृश्य पाहणारेही सुन्न झाले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि पुढचा तपास सुरू केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

5 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago