उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. हा घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे दाम्पत्याच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमागचं कारण कुटुंबीयांना माहिती नसल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस तपासाअंती या घटनेचं कारण स्पष्ट होऊ शकतं; पण सध्या तरी या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या अमरोहा जिल्ह्यातल्या मंडी धनौरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या हलपुरा गावातल्या एका कुटुंबात पतीने आधी गोळ्या झाडून पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. हलपुरा इथले रहिवासी विनय कुमार शर्मा यांनी पत्नी आंचल शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर विनय कुमार शर्मा यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
या प्रकरणी विनय कुमार शर्मांचे वडील किशोरीलाल शर्मा यांनी सांगितले, की ‘माझा मुलगा आणि सून यांनी कोणत्या कारणास्तव एवढं मोठं पाऊल उचललं हे मला माहिती नाही. रोजच्याप्रमाणे रात्री घरातल्या सर्व सदस्यांचं जेवण झाल्यानंतर सर्व जण हसत हसत आपापल्या खोलीत गेलो होतो. विनय आणि आंचल यांची एखादी समस्या आम्हाला समजली असती तर आम्ही ती नक्कीच सोडवली असती.’
या घटनेची माहिती मिळताच परिसरातल्या रहिवाशांची घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. हा प्रकार समजताच सर्वांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा असून, विनय कुमार यांनी असं कृत्य का केलं असावं हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…