ताज्याघडामोडी

पेन्शन दिली नाही म्हणून सूनेचं वाढलं टेन्शन; बापाच्या साथीनं सासूला संपवलं

बिहारमधील नालंदामध्ये पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून सुनेनं सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. तिने तिच्या वडिलांसोबत मिळून हा खून केलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मुरौरा या गावात ही घटना घडली आहे. यानंतर याप्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

विमला शर्मा (५९) असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपी सून रुबी कुमारीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेचा मुलगा कौशल कुमार याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.

या महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्याचं सांगण्यात येतंय. तो सरकारी कर्मचारी होता. यानंतर महिलेला पतीच्या पेन्शनचे पैसे मिळत होते. महिलेचा तिच्या सुनेकडून छळ होत होता. तिला खाण्यापिण्याचीही परवानगी नव्हती. महिलेचं तिच्या सुनेशी अनेकदा भांडण होत असे. सुनेला पेन्शनचे सर्व पैसे स्वतःकडे ठेवायचे होते. यामुळे ती सासूला त्रास देत असे. महिलेची हत्या तिच्या सुनेनेच केली, असं शेजाऱ्यांनीही सांगितलं आहे. आईची हत्या पत्नीनेच केल्याचं मृत महिलेच्या मुलाने पोलिसांना सांगितले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago