ताज्याघडामोडी

दारु पिऊन मित्राला रोज शिव्या, दोस्ताचा पारा चढला अन् निर्घृणपणे संपवलं

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कोयता गँगच्या उच्छादानंतर आता आता दिवसाढवळ्या पुण्यात खून होत आहे. अशातच पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. त्यातच एका खुनाच्या प्रकारात कोंढवा पोलिसांनी एका आरोपीला अवघ्या आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत.

९ जानेवारी रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जन स्थळी एका इसमाच्या तोंडावर मारहाण करुन, गळा आवळून खून करुन बॉडी फेकून देण्यात आली होती. खून करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिल्या होते. अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकामी कोंढवा पोलीस ठाणेकडील दोन तपासपथके तात्काळ रवाना करण्यात आली होती. सहा पोलीस निरीक्षक, लेखाजी शिंदे व सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील हे तपास पथकातील अमलदार यांच्यासह अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते.

प्रथम मयत बॉडी ही नसीम सइदुल्लाह खान (वय ३७ वर्षे, रा. लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. कुशीनगर उत्तरप्रदेश) यांची असल्याची माहिती निष्पन्न केली गेली. तेव्हा सदर इसमाचा कोणाशी वाद आहे का? कोणाशी भांडणे झाली आहे का? याबाबत तपास केला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे सीसीटिव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अगर तांत्रिक पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा प्रथमदर्शनी मिळून न आल्याने पोलिसांसाठी आरोपीबाबत माहिती मिळवणे आव्हानात्मक झाले.

अशा प्रतिकुल परिस्थितीत सदर घटनास्थळी जवळील वस्तीमध्ये राहणारे इसमांनी त्याचा घात केला असल्याबाबत संशय बळविल्याने गोपनीय माहिती काढून कमल रोहित ध्रुव (वय १९ वर्षे, रा.लेबर कॅम्प, कामठेनगर, पुणे मुळ रा. छत्तीसगड) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला. त्याने पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास पोलीस खाक्या दाखवून वेळप्रसंगी भावनिक प्रश्न विचारुन चौकशी केली असता त्याने मयत नसीम सइदुल्लाह खान हा त्यास दारु पिऊन रोजच शिवीगाळ करत होता. तसेच घटनेच्या दिवशी देखील मयताने त्यास पुन्हा शिवीगाळ करुन बाहेर निघून गेला होता. तेव्हा कमल रोहित ध्रुव याने त्याच्या पाठोपाठ हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळस्थळी जाऊन प्रथम हाताने गळा आवळून व नंतर तोंडावर दगड मारुन जखमी करुन खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी व मयत टाइल्स फिटिंगचे काम करायचे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago