बिहारच्या दरभंगा येथील मोरो पोलीस ठाणे रविवारी रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिले. पोलीस ठाण्यातच पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले.
समाजकंटकांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकीही दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॉक्समधून काही ज्वलनशील पदार्थ फवारताना दिसत आहे. फवारणी करून आग लावण्याचा प्रयत्न होतोय याचीही चौकशी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर एसपी सागर कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका अज्ञात युवकाचा चेहरा कैद झाला आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. लवकरच संपूर्ण प्रकरण उघड होईल असं त्यांनी माध्यमांना सांगितले.
घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १२.२१ ते १२.५४ च्या दरम्यान एक तरुण पोलीस ठाण्याला आग लावताना दिसत आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना रोखण्यासाठी ओडी ड्युटी आणि सेन्ट्री ड्युटी कर्मचार्यांच्या कारवायाही तपासल्या जात आहेत असं या प्रकरणाला दुजोरा देताना शहर एसपी सागर कुमार म्हणाले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…