आई आपल्या मुलांनी पहिली रक्षक असते, असं म्हणतात. आपल्या मुलांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आई अगोदर सामोरं जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, कर्नाटकमधील एक आई स्वत:च्या मुलाच्या जीवावर उठली. सूचना सेठ, असं या महिलेचं नाव आहे. गोवा पोलिसांनी बेंगळुरूची रहिवासी असलेल्या सूचनाला तिच्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. ती एका कंपनीची सीईओ आहे. तिने कँडोलिममधील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर मुलाचा मृतदेह पिशवीत भरून ती बेंगळुरूला जाण्याच्या प्रयत्नात होती.
गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वलसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या मुलाच्या हत्येची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामध्ये ही महिला एका पिशवीसह बाहेर पडताना दिसली. मुलाची हत्या केल्यानंतर तिने त्याचा मृतदेह एका पिशवीत भरला आणि नंतर कॅब बुक करून निघून गेली.
या प्रकरणी गोवा पोलिसांनी तत्परता दाखवली आणि कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आयमंगला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पोलीस तिची चौकशी करत असून तिची पार्श्वभूमीही तपासली जात आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…