शहापूर येथे एका व्यक्तीच्या हत्येचा कट त्याच्या मेहुण्यानेच रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी राजन यशवंत हरड (३० रा. कुरुंद), पंकेश मधुकर शिंदे (३३ रा. आणे) व महेश मुकुंद चव्हाण (४० रा. भांडुप) यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्येसाठी मेव्हण्याने देशी बनावटीचे हातबॉम्ब, जिलेटीन आणि डिटोनेटर सुद्धा आणले होते. अशी गंभीर बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी येथील रातांधळे गावच्या हद्दीत तीन तरुण संशयास्पदरित्या पोलिसांना आढळून आले. तिघांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीच्या उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी कळमगावमध्ये राहणारे प्रभाकर सासे यांची रस्त्यात गाठून त्यांची हत्या करण्यासाठी आल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यापैकी पंकेश हा प्रभाकर याचा मेहुणा असल्याची माहिती समोर आली. प्रभाकर हे बहिणीला मारहाण करत होते. तसेच प्रभाकर यांची वर्तणूक चांगली नसल्याने हत्येचा कट रचल्याचे पंकेश याने सांगितले.
पोलिसांनी त्यांच्याकडून टेम्पो, दुचाकी, दोन चाकू, हातबॉम्ब, डिटोनेटर्स, जिलेटीनच्या कांड्या अशी घातक हत्यारे व स्फोटके जप्त केली असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी केली. चाकू हल्ला केल्यानंतर गोंधळ झाल्यास स्फोटकांचा वापर केला जाणार होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून हत्यारे आणि स्फोटके कुठून आणली याचा तपास चालू केला आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…