नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उज्जैनमधून हत्येची एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिलेने पती आणि दिरावर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळीबार केला. यात नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दिराचाही काही वेळाने मृत्यू झाला. या प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही महिला हातात पिस्तूल घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
अतिरिक्त एसपी नितीश भार्गव यांनी सांगितले की, घरगुती वाद आणि जमिनीच्या वादाच्या रागातून महिलेने हे कृत्य केले. महिला अंगणवाडी सेविका आहे. या महिलेने देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. एफएसएल पथकाकडून तपास करण्यात येत असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगणवाडी सेविका आहे. घरात काही कौटुंबिक आणि जमिनीचा वाद होता. यामुळे महिलेने प्रथम आपल्याच पतीवर गोळीबार केला. यावेळी दिर त्याला वाचवण्यासाठी आला असता त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भावाचा रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला.
दिराकडे काही जमीन वगैरे होती. महिलेला जमीन घ्यायची होती, पण पती या प्रकरणात रस घेत नव्हता. यामुळे पत्नीने संतापून दोघांवर गोळीबार केला. आरोपी महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीश भार्गव म्हणाले की, पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार एफएसएलचे पथक पाठवून तपास करण्यात येत आहे. FSL टीम नुकतीच आली आहे. सुमारे 8 ते 10 गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…