ताज्याघडामोडी

पतीची हत्या करून खुंटीला टांगलं, अल्पवयीन भावाचीही घेतली मदत, पत्नीची चलाखी अशी फसली!

मद्यपानाच्या व्यसनातून कौटुंबिक वाद होणं, मारहाण किंवा गंभीर गुन्हा घडणं, असे प्रकार सातत्यानं पाहायला मिळतात. अशा प्रकरणांमध्ये महिला बळी पडण्याचं प्रमाण लक्षणीय असतं. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यात पती मद्यपान करून मारहाण करत असल्याने त्याला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गाझियाबाद जिल्ह्यातल्या मुरादनगरमधल्या सुराना गावातल्या मोनू यादवचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवीन माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती मद्यपान करून मारहाण करत असल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने तिच्या अल्पवयीन भावाच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मोनूने स्वत:च फास लावून घेतला हे भासवण्यासाठी आरोपी महिलेनं मृतदेहाच्या गळ्यात तार अडकवून तो खुंटीला लटकवला आणि बनाव रचला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोनूची पत्नी आणि भाऊ किशोरला अटक केली आहे.

या संदर्भात मन्सूरी मंडलाचे एसीपी नरेश कुमार यांनी सांगितलं, की ‘एका तरुणानं गळफास घेतल्याची माहिती मिळाली होती; पण पोस्टमॉर्टेमच्या अहवालात ही त्याने स्वत: जीवन संपवण्याचा निर्णय घेतला नसून, त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. मृत मोनूचे वडील ईश्वर सिंह यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवला गेला आहे. पत्नी प्रवेश आणि तिच्या अल्पवयीन भावाला अटक करण्यात आली आहे.

सुराना गावातला रहिवासी मोनू यादव (वय 35) त्याची पत्नी प्रवेश आणि आठ आणि सात वर्षांच्या दोन मुलांसोबत राहत होता. तो शेती करत होता. बुधवारी सकाळी मोनू यादवने जीवन संपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला; मात्र पत्नी आणि इतर कुटुंबियांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यास नकार दिला; पण पोलिसांनी पोस्टमॉर्टेम केलं.

गुरुवारी पोलिसांकडे पोस्टमॉर्टेमचा अहवाल आला, तेव्हा प्रकरण वेगळंच असल्याचं स्पष्ट झालं. मोनू यादवचा मृत्यू गळफासानं झाला नसून गळा दाबल्याने झाल्याचं समोर आलं. पोस्टमॉर्टेमच्या अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी ही गोष्ट कुटुंबीयांना कळवली असता त्यांनी मोनूची पत्नी प्रवेश आणि तिच्या भावावर संशय व्यक्त केला.

पोस्टमॉर्टेमच्या अहवालातून पुष्टी झाल्यानंतर आणि कुटुंबीयांच्या संशयावरून पोलिसांनी मृताची पत्नी प्रवेशला ताब्यात घेऊन मुरादनगर पोलीस ठाण्यात आणलं. सुरुवातीला या महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली असता, तिने खरा प्रकार सांगितला. तिने सांगितलं, की `मोनू सकाळपासून रात्रीपर्यंत मद्यपान करायचा. त्याने व्यसनासाठी घरातल्या सर्व वस्तू विकल्या होत्या. दारू पिण्यास विरोध केला तर मारहाण करत असे. तसंच त्याने रात्रीच्या वेळी मला घरातून बाहेर देखील काढलं होतं. मी बऱ्याचदा रस्त्यावर रात्र काढली. उपचार करूनदेखील मोनूचं व्यसन सुटलं नाही. मोनूला दारूचं जास्त प्रमाणात व्यसन होतं. बुधवारी सकाळी तो मद्यपान करून आला आणि भावासमोर मला मारहाण करू लागला. मी त्याला एका खोलीत बंद करून ठेवलं तर तो मला शिवीगाळ करू लागला.`

त्यानंतर आरोपी महिलेने तिच्या अल्पवयीन भावाच्या मदतीनं विजेच्या तारेनं मोनूचा गळा आवळला. त्यानंतर तार गळ्यात अडकवून मृतदेह लटकवला. दोघांनी त्याच्या आत्महत्येचा बनाव रचला. पोलिसांनी मोनूची पत्नी प्रवेशसह किशोरलाही ताब्यात घेतलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago