नवीन वर्ष सुरू होण्यासाठी मात्र काही दिवसांचा काळ बाकी आहे. येत्या दोन दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्ष 2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज समोर आला आहे.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा हवामान अंदाज दिला आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्याचा शेवट अवकाळी पावसाने झाला. यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली.
त्यानंतर मात्र दोन आठवडे महाराष्ट्रात जोरदार थंडी पाहायला मिळाली. कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक हवामान तयार झाले होते. पण आता उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे. उत्तरेकडील राज्यात किमान तापमान वाढले असल्याने थंडी कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील येणारे थंड वारे आता काहीसे कमी झाले आहेत. शिवाय दक्षिणेकडील राज्यांमधून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत.
यामुळे राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता तयार झाली आहे तसेच राज्यातील किमान तापमान कमी झाले असून याचा परिणाम म्हणून आता थंडीचा जोर कमी होऊ लागला आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. डख यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…