ताज्याघडामोडी

मालक कामावरून काढून टाकणार, भर रस्त्यात केला चाकू हल्ला

एक जण दुसऱ्याला चाकू मारत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक जण रक्तबंबाळ झाल्याचं बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवड शहरातील भूमकर चौकातील आहे.

दिगंबर शिवाजी गायकवाड असे चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो जखमी शिवप्पा अडागळे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. जखमी शिवप्पा हे दिगंबरला कामावरून काढणार होते. याच कारणावरून त्याने भर रस्त्यात चाकू हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दिगंबर गायकवाडला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात शिवप्पा आणि दिगंबर यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांनीही मद्य प्राशन केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवप्पाकडे आरोपी दिगंबर हा ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे. परंतु, शिवप्पा त्याला कामावरून काढून टाकणार होता. याची माहिती दिगंबरला मिळताच त्याने टेम्पो आणि त्याची चावी देण्यास नकार दिला होता. यावरून त्यांच्यात भररस्त्यात वाद झाले. दरम्यान भररस्त्यात हाणामारी झाल्यानंतर चालक दिगंबर गायकवाडने शिवप्पा यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत ते रक्तबंबाळ झाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago