सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द आईसोबत झोपी गेलेल्या लेकीचा आणि तिच्या आईचा अज्ञातांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय 75 ) आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय 58 ) अशी मृतांची नावे आहेत.
संपदाबाई आणि त्यांची मुलगी नंदाबाई पर्यंती येथील ग्रामपंचायत कार्यालयानजीकच्या घरात राहात होत्या. घरातच छोट्याशा किराणा मालाच्या दुकानावर त्यांची गुजरान होत होती. दरम्यान आज सकाळी उशीरापर्यंत दुकान व घराचे दरवाजे बंद होते. त्यामुळे ग्रामस्थांनी घराचा बाहेरील दरवाजा खटखटून त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बराच उशीर झाल्यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. समोरचं दृष्य पाहून ग्रामस्थही हादरून गेले. दोघी मायलेकी निपचित पडल्या होत्या. त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतले. दोघींचाही गळा आवळून खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. दरम्यान या वृद्ध महिलांचा का आणि कशासाठी केला याचा अद्याप खुलासा झाला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. माय लेकीची अशी निर्घूण हत्या करण्यात आल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…