ताज्याघडामोडी

बापानेच आजीला संपवल्याचा राग, नातवाने जन्मदात्याचा काटा काढला; नेमकं काय घडलं?

पती-पत्नीच्या वादाच्या रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या हत्येचा बदला घेतला आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपी सुभाष संतोष शेंडगे याच्याविरोधात वडिलांची हत्या केल्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

मयत संतोष शेंडगे याने पत्नी भानूबाई व त्याच्यामधील वादाच्या रागातून रविवारी दुपारी सासू राधाबाई चोरमले यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली होती. त्याची माहिती संतोष याचा मुलगा सुभाष यास कळाल्यानंतर तो मेढ्यांचा वाडा सोडून चौभूत येथे आला. आजीचा मृत्यू झालेला असतानाही संतोष शिवीगाळ करत असल्याच्या रागातून संतापलेल्या सुभाष याने बापाच्या डोक्यात लाकडी दांडका घातला. म्हणजेच, त्याच दिवशी रविवारी वडिलांना मुलाने मारहाण करत गंभीर जखमी केलं. यात जखमी झालेला संतोष हा नगर येथे उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत पावला.

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संतोष हा डोक्यास मार लागल्याने बडबड करत होता. चिडचिड करत होता. डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर तशी तयारी सुरू असतानाच संतोष याचा मृत्यू झाला. आईनेच मुलगा सुभाष याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यात नमूद करण्यात आलं आहे की, ”पती संतोष किरकोळ कारणांवरून मारहाण करत असल्याने आपण गेल्या दोन-तीन वर्षांपासून संतोष याच्यासोबत न राहता मुलांचे मेढ्यांचे वाडे असतील त्या ठिकाणी तसेच बहीण कांताबाई हिच्या मेंढयांच्या वाड्यासोबत राहत होतो.

१५ ते २० दिवसांपूर्वी सासरे आणि दिरांनी संतोष यास म्हस्केवाडी येथे आपणाजवळ आणून सोडल्यानंतर तेथेही संतोष त्रास देत असल्याने मला आधार वाटावा म्हणून संतोष यास घेऊन चौभूत येथील भावाच्या घराजवळ राहण्यासाठी गेलो हातो. ताडपत्रीचे पाल टाकून ते भावाच्या घराशेजारी राहत होते. मात्र, तिथेही संतोष हा शिवीगाळ करून झोपेत जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामूळे आपण आईच्या खोलीत झोपत असे. त्या रागातून पती संतोष आई राधाबाई तसेच भानूबाई यांना शिवीगाळ करत असे. संतोष याने पडवीमध्ये झोपलेल्या सासू राधाबाई यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारले. संतोष याने राधाबाईचा हत्या केली, आजीचा खून केला म्हणून संतप्त नातवाने बदला घेण्यासाठी जन्मदात्या बापाचीच हत्या केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago