खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थीनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील युवकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक व सांगवी ग्रामस्थांनी विद्यार्थीनीचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका शिरवळ पोलीस ठाण्यात आणल्याने शिरवळ पोलीस स्टेशन परिसरात तणाव निर्माण झाला होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगवी येथील एक १५ वर्षीय विद्यार्थीनी शिरवळ परिसरातील एका प्रतिष्ठीत शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, बुधवार दि. २९ नोव्हेंबर रोजी ही शालेय विद्यार्थीनी ही पायी घरी जात असताना शिरवळ ते नायगाव जाणाऱ्या वसतिगृहाजवळील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या अक्षय पोपट लांडगे (वय २०, रा. खंडाळा, ता. खंडाळा) याने संबंधित विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात या विद्यार्थीनीने दिल्यानंतर संबंधितांविरुध्द विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अक्षय लांडगे याला शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले होते. यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून अक्षय लांडगे याच्या दोन मित्रांनी संबंधित विद्यार्थीनीच्या घरी जात दहशत निर्माण करीत तिच्या आईचा विनयभंग केल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
यानंतर १५ वर्षीय विद्यार्थीनीचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता मुलीने घराच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असता नातेवाईक व सांगवी ग्रामस्थांनी संबंधित मृतदेह रुग्णवाहिकेमधून सुसाईड नोटमधील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत मृतदेह शिरवळ पोलीस ठाण्यात आणला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाली होते. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ व शिरवळ पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी शिरवळ पोलिसांनी संबंधितांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी सांगवी येथे घेऊन जाऊन अंत्यसंस्कार केले. या घटनेची गणेश लोखंडे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरवळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलीस अंमलदार तुषार कुंभार तपास करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…