लग्न अवघ्या दोन महिन्यांवर आलं असताना तरुणीचा मृतदेह तिच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. नेहमी आनंदी जगणाऱ्या मोहिनी बालाने आत्महत्या कशी केली असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे. तिचा मोबाईल चेक केला असता त्यात अनेक खुलासे झाले. रात्री दोन वाजेपर्यंत चॅट करत बसलेल्या मोहिनीने सकाळी गळफास कसा घेतला याचा उलगडा मोबाईलवरून झाला आहे. रांचीतील मोहिनी नावाच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
मोबाईलमधून अशी माहिती समजली की, तरुणीला ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं. नितीश राणा नावाच्या तरुणाने हे कृत्य केलं. सुखदेवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रपुरी रोड नंबर १२ वर तरुणीने गळफास घेतला. मोहिनीच्या काकांनी पोलिसांना सांगितले की, १५ डिसेंबरला रात्री जेवल्यानंतर ती नेहमीप्रमाणे खोलीत गेली. शनिवारी सकाळी ती खोलीतून बाहेर आली नाही तेव्हा हाक मारली. तरीही दरवाजा उघडला नाही.
खिडकीतून पाहिले असता तिने दुपट्ट्याच्या मदतीने गळफास घेतला होता. दरवाजा तोडून तिला खाली उतरवण्यात आलं पण तोपर्यंत मृत्यू झाला होता. रविंद्र यांनी सांगितलं की, मोहिनी मिळून मिसळून राहणारी मुलगी होती. तिचं लग्न फेब्रुवारी महिन्यात होतं आणि लग्नाची तयारीसुद्धा चालली होती.
पोलिसांनी तपास करत असताना मोबाईल चेक केला. त्यात तरुणीला नितीश राणा नावाचा तरुण त्रास देत होता असं समजलं. लग्न करू नये यासाठी दबाव टाकत होता आणि असं केलं नाही तर आत्महत्येसाठी प्रवृत्त करत होता. रात्री उशिरापर्यंत नितीश राणा तिला त्रास देत होता. शुक्रवारी रात्री १ वाजून ५० मिनिटापर्यंत नितीश मोहिनीसोबत चॅटिंग करत होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…