कोकणात चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चिपळूण हादरले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार सामूहिक बलात्काराचा असल्याची चर्चा असून त्या दिशेनेही कसून तपास पोलिसांकडून सुरू असून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वरजवळील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलीचा मोबाईल नंबर आरवली परिसरात राहणाऱ्या तरुणाने मिळवला. त्या आधारे तिला तो कायम संपर्क करत होता. ती मुलगी त्याचा फोन टाळत असे. मात्र तरीही सतत फोन करीत होता. अखेर नाईलाजाने त्याचा फोन तिने स्वीकारला. तो सातत्याने तिला तुझ्यावर प्रेम आहे वगैरे सांगू लागला. मात्र ती मुलगी त्याला टाळत होती. पण तरी तो तिच्या सातत्याने फोनवर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तो मुंबईतून गावी आला. मुंबईहून तो १३ डिसेंबरला चिपळूण सावर्डे परिसरात दाखल झाला. त्याने त्या मुलीला कॉल केला. ‘मला फक्त तुला एकदा भेटायचे आहे, मी मुंबईहून तुझ्याजवळ बोलायचे म्हणून आलो आहे. मला फक्त एकदाच भेट दे’ अशी विनंती करू लागला होता.
त्यानंतर तिच्या घराजवळ जाऊन तिला त्याने बाहेर बोलावले. जबरदस्तीने गाडीवर बसवून आपल्या मित्राच्या घरी आणले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या अतिप्रसंगाने ती मुलगी जागीच बेशुद्ध पडली. तेव्हा तिला तिथेच टाकून त्या तरुणाने पलायन केले. दीड दोन तासानंतर ती शुद्धीवर आंल्यानंतर घरात पोहचली. पूर्णतः भयभीत झालेल्या आपल्या लेकीला बघून वडील आणि नातेवाईक यांनाही मोठा धक्का बसला. तिने आपल्यावर ओढावलेला प्रसंग घरी सांगितला. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिचे नातेवाईक तिला घेऊन पोलीस स्थानकात दाखल झाले. एका अल्पवयीन मुलीवर ओढवलेल्या या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी तात्काळ तपासाची सूत्र हलविली.
आपल्या कर्मचाऱ्यासह स्वतः त्या तरुणांचा सर्वत्र शोध घेतला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आली. अखेर या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्या तरुणाच्या मोबाईलमधून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्या विरोधात भादवी कलम ३७६, बाल लैगिंग शोषण (पोस्को) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…