छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने प्रियकराची हत्या केलीय. आपल्या मुलाच्या मदतीने या महिलेने भेटीसाठी घरी आलेल्या प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली. त्यानंतर त्याला टेकडीवर फेकून दिलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या प्रियकराचं नाव आनंद साहेबराव वाहुळ (२७) रा. कबीरनगर, उस्मानपुरा) आहे. आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचं एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. ते दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला.
शहरात आल्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळा माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झालाय, त्याला हे कळेल, वाद वाढतील, असं या महिलेने त्याला सांगितलं. परंतु आनंद यासाठी तयार नव्हता. आनंद ऐकत नसल्याचं पाहून या महिलेने त्याची हत्या करण्याचा कट केला. या महिलेने तिचा मुलगा व इतर तीन आरोपींच्या मदतीने १३ डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करत त्याला बेदम मारहाण केली.
गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदचा मृत्यू झाला. साई टेकडी परिसरात सांयकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी या प्रकरणाची माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. या घटनेचे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेनदासाठी घाटीतील शवागृहात पाठवला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…