ताज्याघडामोडी

धक्कादायक! पत्नी व्हॉट्सअपवर बोलत होती; पतीला राग अनावर, संतापात नको ते करून बसला अन्…

सोशल मीडियामुळे जग जवळ आले असे आपण म्हणतो. पण त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत. सोशल मीडियावरून पती पत्नीमध्ये भांडणे होताना देखील आपण अनेकदा पहिली आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. आपली पत्नी सतत व्हॉट्सअपवर का बोलते या गोष्टीचा मनात राग धरून पतीने दारूच्या नशेत पतीने पत्नीला गळफास देऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांगावी पोलीस ठाण्यात पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती विकी रमेश सोनवणे आणि सासरा रमेश तुकाराम सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील मिलिटरी स्टेशन येथे रविवारी रात्री ते १३ डिसेंबर या दरम्यान घडला आहे. याबाबत संबधित महिलेने फिर्याद दिली आहे. विकी याची पत्नी सतत सोशल मीडियावर व्हॉट्स अपवर चॅटिंग करत होती. त्याचा राग पतीच्या मनात होता. त्या रागाच्या भरात पती विकी याने पत्नीच्या गळ्यात दोरीचा फास लावला. त्यानंतर पत्नीला सीलिंग फॅनला दोरी लावून खुर्चीवर उभे केले. पत्नी उभी राहिल्यानंतर पतीने खुर्ची खाली ढकलून देत तिला गळफास देण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे तिच्या मदतीला आले.

याबाबत सासऱ्यांना सर्व माहीत असताना देखील त्यांनी सुनेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. विकी हा अनेकदा तिला दारू पिऊन मारहाण करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विकी हा आर्मीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनेनंतर सांगवी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago