ताज्याघडामोडी

माजी सभापतीने छाटले तरुणाचे दोन्ही हात; धक्कादायक कारण समोर

ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे. मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीने गावातील तरुणावर भररस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने सपासप वार करून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुरबाडमध्ये पोलिसांच्या गस्तीने सर्वत्र शांतता व सुव्यवस्था असतानाच आज संध्याकाळी मुरबाड बारवी धरण रस्त्यावर विस्डम शाळेसमोर देवपे गावातील तरुण सुशील भोईर (वय 27 वर्ष) हा रिक्षाने जात असताना मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ हे आपल्या साथीदारांसह कारने येऊन रिक्षा अडवली. सुशीलला बाहेर काढून तलवारीने सपासप वार करीत दोन्ही हात छाटून टाकले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी श्रीकांत धुमाळ याच्यासह त्याचा मेहुणा अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतर यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago