ताज्याघडामोडी

समोर दीड वर्षांची चिमुकली, पोटात 6 महिन्यांचा गर्भ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, वडिलांना कॉल केला अन्…

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. विवाहितेनं आत्महत्येपूर्वी आपल्या वडिलांना कॉल केला होता, वडील तिला घ्यायला सासरी येणार होते, मात्र त्यापूर्वीच तीने टोकाचं पाऊलं उचललं. अलका पवन मुटकेर असं या महिलेचं नाव आहे. अलका यांना एक दीड वर्षांची मुलगी देखील आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पती सतत दारू पिऊन छळ करायचा, वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नाहीत. हे कृत्य नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्याचे त्याने कबूल देखील केले होते. मात्र, त्रास कमी झालाच नाही. शेवटी कंटाळून 6 महिन्यांची गर्भवती असलेल्या अलका पवन मुटकेर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी मध्यरात्री 2 वाजता पती घरी परतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. आत्महत्येपूर्वी अलका यांनी आपल्या वडिलांना कॉल केला होता. वडील मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते. मात्र, अलका यांनी त्यापूर्वीच आपलं आयुष्य संपवले. काही तासांतच वडिलांना मुलीच्या मृत्यूचा कॉल गेला. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीसह त्याच्या भावाला अटक केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago