पोटगी आणि मुलीचा ताबा मिळण्याबाबत पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून जावयाने सासूला चाकूने भोकसल्याची घटना पुणे जिल्ह्यातील हवेली ग्रामपंचायत येथील नायगाव हद्दीत घडली आहे. ही घटना बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (२८, रा. सध्या आर्दश कॉलनी नायगाव ता. हवेली, जि. पुणे.) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम बळवंत शिंदे (३८, रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोंडनिंव ता. माढा जि. सोलापुर) असे हल्ला करणाऱ्या आरोपी जावयाचे नाव आहे. तर अलका गवळी (रा. नायगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. आरोपी संग्राम आणि रुपाली यांचा विवाह झालेला आहे. त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. बुधवारी संग्राम हा रुपाली राहत असलेल्या ठिकाणी आला होता. रुपाली शिंदे यांनी संग्राम याच्यावर पोटगी आणि मुलीचा ताबा मिळणेबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार संग्राम याने रुपालीला केलेली केस मागे घे, असे म्हणाला. यावेळी फिर्यादी यांनी आरोपीला जे काही होईल ते कोर्टात होईल” असे म्हणाले.
याचा आरोपीला राग आल्याने त्यांनी त्यांचे टिफिनच्या पिशवीतून आणलेला धार धार चाकू काढून रुपाली यांना तुला जिवानीशी सोडणार नाही असे म्हणाला. यावेळी संग्राम हा रुपालीच्या अंगावर धावत जाऊन मारत असताना अल्का गवळी यांनी मध्यस्ती केली. आरोपी संग्राम याने तुझ्यामुळेच सगळं होत आहे. तुच केस मिटवू देत नाही. तुलाच खल्लास करतो, असे म्हणत धारधार चाकुने सासू अल्का गवळी यांना चाकूने ३ वेळेस भोकसले तसेच डाव्या हातावर चाकुने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…