गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी गावात ६ डिसेंबर रोजी झालेल्या वृद्ध दाम्पत्य आणि एका दहा वर्षीय बालिकेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
दोन मुलं आणि पाच नातेवाईकांनी मिळून जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध आई-वडील आणि भाचीची हत्या केल्याचे उघड झालं आहे. मुलगा रमेश कुमोटी, दुसरा मुलगा विनु कुमोटी तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजू आत्राम, नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
6 डिसेंबरला रात्री 60 वर्षीय देऊ कुमोटी आणि त्यांच्या पत्नी बीचे देऊ कुमोटी यांच्यासह 10 वर्षीय नात अर्चना तलांडी यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा तपास करताना तक्रार करणाऱ्यावर संशय आल्याने पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…