कामगार, मजूरांवर मालकांनी अत्याचार केल्याच्या घटना अनेकदा घडतात. हरियाणात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकाने निर्दयपणे मारहाण केली. तसंच तिला कपडे उतरवण्यास आणि कुत्र्याला तिला चावण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हरियाणातल्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. तिथल्या सेक्टर 57 परिसरात घरकाम करणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीला मारहाण करण्यात आली. तसंच तिला कपडे काढण्यास आणि कुत्र्याला तिला चावा घेण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी शनिवारी (9 डिसेंबर) ही माहिती दिली.
यासंदर्भात सेक्टर 51 च्या महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, या मुलीचे मालक तिच्या हातावर अॅसिड टाकत होते. तसंच याविषयी कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी देत होते. मुलीच्या आईनं सांगितलं, की ‘मी 27 जूनला जवळच्या भागात वाहन स्वच्छ करणाऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने माझ्या मुलीला सेक्टर 57 मधल्या शशी शर्मा यांच्या घरी कामाला लावलं. मुलीला त्यांच्यासोबत ठेवण्याचं आणि नऊ हजार रुपये वेतन देण्याचं ठरलं; पण वेतनाची रक्कम मला केवळ दोन महिनेच मिळाली. मी बऱ्याचदा माझ्या मुलीला भेटायला गेले; पण मला भेटू दिलं गेलं नाही. तिला माझ्याशी फोनवरही बोलू दिलं नाही.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईनं तक्रार दाखल केली आहे. ‘ज्या घरात मुलगी काम करत होती, ते कुटुंब तिला लाकूड किंवा लोखंडी रॉडने मारहाण करत असे. महिलेच्या दोन्ही मुलांनी माझ्या मुलीला विवस्त्र केलं. तिचा व्हिडिओ शूट केला. तसंच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. आरोपी कुटुंबाने घरकाम करणाऱ्या मुलीला ओलीस ठेवलं,’ असं तक्रारीत लिहिलेलं होतं. पीडितेच्या आईने तिला शनिवारी (9 डिसेंबर) मुक्त केलं. पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की ‘माझ्या मुलीला दोन दिवसातून एकदाच जेवण दिलं जायचं. तसंच ती आरडाओरडा करू नये, यासाठी तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली असायाची.’
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…