किरकोळ कारणांवरून आत्महत्या करणं किंवा आप्तेष्टांना जीवे मारण्याच्या घटना सध्या आजूबाजूला घडत असल्याचं आपल्याला वाचायला, ऐकायला मिळतं. अगदी क्षुल्लक कारणांवरून हे गुन्हे घडतात. अनेकदा गुन्ह्यांसाठी वैर, बदल्याची भावना, विश्वासघात किंवा फसवणूक कारणीभूत ठरते. असाच एक विश्वासघाताची घटना घडली आहे. दीड कोटी रुपये उधार घेतल्यानंतर ते परत द्यायला लागू नयेत म्हणून कर्ज देणाऱ्या उद्योजकाचीच हत्या घडवून आणल्याचा खळबळजनक प्रकार ठाण्यात घडला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दीड कोटी रुपये उधार देणारी व्यक्ती उद्योजक होती. तर उधार घेणारी तसेच व्यापाऱ्याच्या हत्येचा कट रचून सुपारी देणारी व्यक्ती व्यवसायाने कर सल्लागार आहे.
ठाणे पोलिसांनी या प्रकरणी हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मात्र सुपारी घेऊन हत्या करणारे दोघे मारेकरी फरार आहेत. एका टॅक्स कन्सल्टंटने एका उद्योजकाकडून थोडेथोडके नव्हे तर दीड कोटी रुपये उधार घेतले होते. उद्योजक ते परत मागू लागला होता. हा वसुलीचा ससेमिरा चुकवण्यासाठी उद्योजकाचीच हत्या घडवण्यासाठी टॅक्स कन्सल्टंटने सुपारी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ठाण्यात हत्या झालेला हा उद्योजक 55 वर्षांचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्ष वयाच्या कर सल्लागाराने (टॅक्स कन्सल्टंट) या उद्योजकाकडून दीड कोटी रुपये उधार घेतले होते. सदर उद्योजकाने पैसे परत मागितले तेव्हा ते परत न देण्यासाठी काही ना काही कारणं देण्यास कर सल्लागाराने सुरुवात केली. पैसे परत करायला नको म्हणून आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने सुपारी किलर्सची मदत घेऊन उद्योजकाच्या हत्येचा कटही रचला.
भूषण पाटील असं या टॅक्स कन्सल्टंटचं नाव आहे. भूषणने सतीश पाटील या उद्योजकाकडून त्याने दीड कोटी रुपये उधार घेतले होते. पैसे परत करायची वेळ आली तसा भूषणने नितीन पाटील या सहकाऱ्याला हाताशी धरुन सुपारी किलर्सशी संपर्क साधला आणि सतीश पाटील यांच्या हत्येचा कट रचला. मारेकऱ्यांनी तलवारीचे वार करून सतीश यांची हत्या केली.हत्येची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचताच प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. पोलिसांनी भूषण पाटीलची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला असता त्याने हत्येची कबुली दिली. भूषण पाटील आणि नितीन पाटील सध्या पोलिसांच्या ताब्यात असून दोन्ही सुपारी किलर्सचा शोध सुरु आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…