कटनी ते सतना दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये महिलेसोबत छेडछेड केल्याची घटना समोर आली आहे. सतना रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबल्यावर आरोपीने महिलेला बोगीतून बाहेर फेकून गेट बंद केलं. ट्रेन स्टेशनवर 30 मिनिटं उभी होती, पण जीआरपीला बोगीचं गेट उघडता आलं नाही. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडल्याचं सांगण्यात येत आहे. सतनाहून निघाल्यानंतर रीवाच्या आधी बगहाई येथे गाडी थांबवण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी जीआरपी-आरपीएफने सध्या मौन बाळगलं आहे. ज्या रेल्वेत ही घटना घडली ती गाडी विधानसभा निवडणुकीसाठी आलेल्या पोलीस दलासाठी धावत होती. ट्रेन रिकामी होती आणि कटनीहून परतत होती. गाडी पकारिया स्टेशनवर बराच वेळ उभी राहिली. दरम्यान, महिला ट्रेनमध्ये टॉयलेटला गेली असता आरोपीने तिला पकडलं. या महिलेला जीआरपी चौकीत आणण्यात आलं आहे. पीडितेने सांगितलं की, जेव्हा ती ट्रेनमध्ये चढली तेव्हा तिच्या मागे कोणीतरी आहे याची तिला कल्पना नव्हती. अज्ञात व्यक्तीने येऊन तिला ढकलून मारहाण करण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ही महिला कटनी ते उचेहरा या मेमू ट्रेनमध्ये प्रवास करत होती. ट्रेन कटनीपासून काही अंतरावर असलेल्या पकारिया स्टेशनवर आली तेव्हा एसी कोचमध्ये बसलेली महिला बाथरूममध्ये गेली. दरम्यान, पंकज कुशवाह नावाचा तरुण ट्रेनमध्ये चढला आणि बाथरूममध्ये घुसून बाथरूमचा दरवाजा बंद करून तरुणीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ट्रेन सतना स्थानकावर येताच मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला. यानंतर आरोपीने महिलेला बोगीतून बाहेर फेकलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…