ताज्याघडामोडी

सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी, धक्कादायक कारण समोर

पैशाचा वाद टोकाला गेल्याने सख्ख्या भावाने आपल्या सैनिक असलेल्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण विनायक पवार असे मयताचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफमध्ये नोकरीला असून मागील पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. काल प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, मारहाणीत जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन उपचरादरम्यान पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास उपनिरीक्षक आदिनाथ भडके करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago