ताज्याघडामोडी

नातवाच्या रडण्याचा आवाज आजोबा झाला नकोसा, चाकूने आयुषला संपवलं अन् सूनमध्येच आली…

उत्तर प्रदेशातल्या सीतापूरमध्ये दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना घडली आहे. नातवाच्या रडण्याचा राग आल्याने आजोबांनी त्याच्यावर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. एवढंच नाही तर मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. दुहेरी हत्याकांडाच्या या खळबळजनक घटनेत एका वर्षाच्या निष्पाप नातवाचा जागीच मृत्यू झाला, तर सून शिखा हिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी हत्येचे आरोपी आजोबा कमलकांत यांना ताब्यात घेतलं. एसपी चक्रेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलकांत यांनी आपली सून आणि नातवाची हत्या केली. तसंच ते मानसिकरीत्या अस्वस्थ होते, असं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुहेरी हत्याकांडाची ही घटना ताळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवरिया इथे घडली आहे.

देवरियातले रहिवासी असलेले अच्छे शर्मा पंजाब प्रांतातल्या जगाधरीतल्या एका दुकानात काम करतात, तर त्यांची पत्नी शिखा आणि एक वर्षाचा मुलगा आयुष देवरियामध्ये आजी-आजोबांसोबत राहत होता. त्या दिवशी आयुषला काही तरी हवं असल्याने तो रडू लागला. त्याच्या रडण्याचा राग आजोबा कमलकांत यांना अनावर झाल्याने त्यांनी घरातला चाकू घेऊन आयुषवर वार केले. यात त्या निष्पाप जीवाचा मृत्यू झाला. आपल्या चिमुकल्याला आपला सासरा मारत असल्याचे पाहून आयुषची आई शिखा धावत त्याच्याजवळ आली आणि तिने आयुषला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण सासऱ्याने रागाच्या भरात आपल्या सुनेवरही हल्ला केला, असं सांगण्यात येत आहे. हे सर्व पाहून सासू रामदेवी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्या वेळी गावातले सर्व नागरिक घटनास्थळी गोळा झाले. या हल्ल्यात 1 वर्षाचा निष्पाप नातू आयुष याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच ताळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शिखाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. परंतु तिथे पोहोचल्यावर शिखाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

10 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago