हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका डॉक्टरने आपल्या निष्पाप मुलगी आणि मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. आरोपीने पत्नीचीही अशीच हत्या केली आणि अखेर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून हे हृदयद्रावक प्रकरण समोर आलं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता, मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
पोलिसांनी सांगितलं की डॉ. अरुण सिंह मॉडर्न रेल कोच फॅक्टरीत डोळ्यांचे डॉक्टर होते आणि ते सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते. त्यांचा मृतदेह शासकीय निवासस्थानात फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बेडवर पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डॉक्टरने मुलगा, मुलगी आणि पत्नीला ज्या हातोड्याने मारलं तोही जवळच सापडला. पोलिसांनी हातोडा ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितलं, की डॉ.अरुण यांनी आधी पत्नी आणि दोन्ही मुलांना नशेचं औषध दिलं होतं. तिघेही बेशुद्ध होताच डॉक्टरने आधी आपल्या चार वर्षाच्या मुलाला हातोड्याने मारून ठार केलं. यानंतर 11 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता की एकाच वारात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी डॉक्टरने पत्नीची हत्या करून त्याच खोलीत गळफास लावून घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात डॉक्टरच्या शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली आहे. यावेळी या कुटुंबातील कोणीही गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर कोणाशीही संपर्क साधला नसल्याचं समोर आलं. हे लोक घरातूनही बाहेर पडले नाहीत. मात्र, मंगळवारी रेल्वे कोच फॅक्टरीच्या एका कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने त्यांच्या घरात डोकावून पाहिल्यानंतर आतील दृश्य पाहून पोलिसांना माहिती दिली. एसपी रायबरेली आलोक प्रियदर्शी यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…