ताज्याघडामोडी

नातेवाईकाकडे जाते सांगत महिला घराबाहेर पडली; नंतर जे घडलं त्यानं कुटुंबाला बसला धक्का

चिपळूण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने हा सगळा नक्की प्रकार काय आहे? याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत हा मृतदेह परशुराम पायरवाडी येथील एका महिलेचा असल्याचे निष्पन्न केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्या चंद्रकांत मेटकर (३४) या विवाहित महिलेचा हा मृतदेह असल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. परशुराम घाटाजवळ असलेल्या सवतसडा धबधबा या ठिकाणी असलेल्या दगडाच्या रांजणात या महिलेचा मृतदेह मिळाला मिळाला होता. अडकलेले स्थितीत हा मृतदेह मिळाल्याने या सगळ्या प्रकाराबद्दल अपघात की घातपात या चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला या महिलेचे नाव कळत नसल्याने हा मृतदेह कोणाचा ही महिला कोण? हा सगळा प्रकार काय आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते होते.

मात्र चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या मृतदेहाचे नाव आणि अन्य प्राथमिक माहिती मिळवली आहे. ही महिला नातेवाईकाकडे जाते असे सांगून घरातून निघाल्याची चर्चा परिसरात आहे. सोमवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात या सगळ्या घटनेची नोंद करण्यात आली. ही महिला परशुराम येथील पायरवाडीत राहणारी आहे. या महिलेचा पती हा मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार आहे.

या महिलेला एक लहान मुलगा असून ती गावी आपले सासरे, दीर, जाऊ आणि दिराची दोन मुले या कुटुंबासमवेत राहत होती. मात्र ही महिला घरातून निघून गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची खबर चिपळूण पोलिसांना देण्यात आली होती का? ही महिला त्या ठिकाणी नेमकी कोणत्या कारणासाठी गेली? किंवा तिने स्वतःहून काही जीवाचे बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला का? की त्या ठिकाणी गेल्यावर तिचा घसरून पाय पडून अडकल्याने मृत्यू झाला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या सगळ्या अनुषंगाने चिपळूण पोलीस तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago