मुंबई जवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील वसई फाटा येथे एका 8 वर्षीय लहानगीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला आहे. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते. चांदनी अशोक साह असं आठ वर्षीय मुलीच नाव आहे. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. ही चिमुरडी 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घराजवळील दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली होता. त्यानंतर ती घरी आलीच नाही. अचानक चांदनी बेपत्ता झाली होती. दिवसभरात मुलीचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही. अखेरीस त्याच दिवशी रात्री वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता.
बेपत्ता चांदनीचा सर्वत्र शोध घेतला जात होता. यासाठी चांदनीला शोधून आणणाऱ्या व्यक्तीला 20 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील 3 दिवसांमध्ये तिचा कुठेच पत्ता लागला नाही. पण आज 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत बंद रुममध्ये घाण वास येत होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बंद रुमचा दरवाजा तोडून प्रवेश केला असता मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या अवस्थेत चांदनीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…