“नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात एका 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. नाश्त्यावरून त्याचा आईसोबत वाद झाला होता. प्रकरण कन्हान पिंपरी परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी त्यांना मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे हा तरुण बेपत्ता झाल्याचा गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे का, याचा शोध पोलिसांनी घेतला.”
तपासात समोर आलं, की मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. रविवारी सकाळी त्याने आईकडे नाश्ता मागायला सुरुवात केल्याचं उघड झालं. मात्र तोपर्यंत नाश्ता शिजला नव्हता. यावरून मुलाचं आईशी भांडण सुरू झालं. त्यानंतर तो रागाने घरातून निघून गेला.
बराच वेळ तो परत न आल्याने घरच्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने फोन उचलला नाही. त्यानंतर पालकांनी त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मुलाबाबत काहीही माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र नंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं सांगितलं. आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याने खरोखरच आत्महत्या केली आहे की प्रकरण वेगळं आहे, याचा शोध घेतला जात आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…