जि.प.शाळा आंबे येथील पदवीधर शिक्षिका सौ.संगिता तांबोळकर मॅडम या दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्तीपर सत्कार समारंभ शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अशोक शिंदे ( ग्रामपंचायत सदस्य आंबे ) हे होते. यावेळी सत्कारमूर्ती सौ. तांबोळकर मॅडम यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.कल्पना ढेरे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच श्री.तांबोळकर साहेब ( सेवानिवृत्त कृषी अधिकारी ) यांचाही सन्मान श्री.अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री.संतोष कोळी सर, श्रीम.कल्पना ढेरे मॅडम,श्रीम.कल्पना भुसे मॅडम, श्री.राजेंद्र डुबल सर, श्री.विवेक तांबोळकर साहेब व स्मिता देशपांडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून तांबोळकर मॅडम यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा जणू लेखाजोखाचं समोर मांडला. प्रत्येकांनीच मॅडमच्या सहवासात आलेल्या चांगल्या अनुभवांचे प्रसंग कथन केले. यावेळी तांबोळकर कुटुंबियांकडून शाळेसाठी मुख्याध्यापकांसाठी मोठी खुर्ची व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाणी बॉटल व खाऊ देण्यात आला.
याप्रसंगी चळे केंद्रातील शाळांच्या वतीने ही तांबोळकर दांपत्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. योगायोग म्हणजे तांबोळकर मॅडम यांचा वाढदिवस सुध्दा 1 डिसेंबरला असल्याने त्यांचा वाढदिवस त्यांच्या वर्गातील मुलांनी केक कापून साजरा केला.शाळेच्या वतीनेही त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री.ज्ञानेश्वर कोळी ( उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आंबे), श्री घाडगे साहेब (सेवानिवृत्त कृषी अधिकारी ), श्री.आण्णा रायजादे ( जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शिक्षक समिती ), श्रीम.कल्पना भुसे ( केंद्रीय मुख्याध्यापिका चळे), श्री. राजेंद्र डुबल (मुख्याध्यापक शाळा मुंढेवाडी ) तसेच चळे केंद्रातील सर्व शाळांचे प्रतिनिधी व आंबे शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संभाजी माने यांनी केले तर आभार श्रीम.रोहीणी होमकर यांनी मानले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…