राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान अशीच एक घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे. एका मुलाने पैसे न दिल्याच्या रागातून आईवर हल्ला केला आहे. ५ हजार रुपये मागितले असता आईने पैसे न दिल्याने मुलाने आईलाच शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी परभणीच्या सेलू ठाण्यात मुलाविरुद्ध आईने तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गयाबाई लक्ष्मण भवर (रा. दत्तनगर, सेलू) असं या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर परभणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फिर्यादीत असे म्हटले आहे, २६ नोव्हेंबरला ६ वाजता मुलगा दत्ता लक्ष्मण भवर याने फिर्यादी आईस ५ हजार रुपये मागितले. फिर्यादीने मुलाला पैसे देण्यास नकार दिला.
यानंतर पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपीने आईला शिवीगाळ करून धमकी दिली. मुलाना लोखंडी गजाने फिर्यादीचे दोन्ही पायावर, डाव्या हाताचे कोपरावर, पाठीवर मारहाण करून फैक्चर करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी पो. नि. एस. के. चवरे यांच्या आदेशाने सेलू ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी किर्तेश्वर तेलंगे घटनेचा पुढील तपास करत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…