एका १३ वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं. तिने आपल्या आईला याबाबत सांगितलं. आईने मुलीला घेऊन हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर जे सांगितलं त्याने आईला मोठा धक्का बसला. बहीण भावाच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
डॉक्टरांनी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचं सांगितलं. हरियाणाच्या जिंदमध्ये हा प्रकार घडला आहे. महिलेने जेव्हा मुलीला याबाबत विचारलं तेव्हा तिने जे सांगितलं ते आणखी धक्कादायक होतं. दुसरं कुणी नाही तर चुलत भावानेच तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकारानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईने तिच्या दिराच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केलीय. या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारीनुसार आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागलं. तिला रुग्णालयात नेले असता ती ४ महिन्याची गर्भवती असल्याचं समोर आलं.
महिलेने मुलीला विचारल्यानंतर तिने सांगितलं की, ४ महिन्यापूर्वी जेव्हा घरी कोणी नव्हतं तेव्हा चुलत भावाने दुष्कृत्य केलं. कुणाला काही सांगू नये यासाठी धमकीही दिली होती. पीडितेने आरोप केला की, त्यानंतरही चुलत भावाने दुष्कृत्य केलं. पीडिता आणि चुलत भाऊ दोघांचेही कुटुंब एकत्रच राहते. पिडितेच्या तक्रारीनंतर आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच पुढील कारवाई केली जाईल असी माहिती पोलिसांनी दिली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…