उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका व्यक्तीला गरम जेवण न मिळाल्यामुळे जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर उकळते तेल आतेले आहे. तेल ओतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेने लग्नसमारंभात एकच खळबळ माजली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील मूसघाण पोलीस ठाण्याच्या परिसरात पन्नालाल यांच्या मुलीचे बुधवार(ता.२९) रोजी लग्न होते. लग्न कार्यादरम्यान पाहुणे मंडळी जेवणासाठी गेले होते. दरम्यान नवऱ्या मुलाचे काका इंद्रपालही जेवणासाठी काही नातेवाईकांसोबत जेवायला गेले.त्यावेळी तिथं असलेला आचारी राजेश हा चपाती बनवत होता. त्याने एक चपाती भाजली आणि तिथं उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिली. त्यावर ही चपाती तेथील एका काकांना थंड वाटली. त्यामुळे चपाती थंड का आहे असं त्याने आचाऱ्याला विचारलं…. परंतू आरोपी काकांना आचाऱ्याने गरम चपाती देण्यासाठी काही वेळ थांबण्यास सांगितले असता आरोपीला राग आला.
काका आणि आचाऱ्यामध्ये यावरून वाद सुरु झाले. हा वाद इतका विकोला गेला की काकांनी रागात येऊन त्याच्या समोर असलेल्या गरम कढईतले उकळते तेल आचाऱ्याच्या अंगावर फेकले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…