ताज्याघडामोडी

बिल्डरची सासऱ्यासमोर शिवीगाळ, अपमान झाल्याने तरुण दुखावला, व्हिडीओ शूट करत उचललं टोकाचं पाऊल

पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डरकडे चालक कम सुपरवायझरचे काम करणार्‍या तरूणाने मृत्यूपूर्व व्हिडीओ तयार करून सहाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरच्या लोकांसमोर आपल्याला नाहक अपमानित केल्याने मी आत्महत्या करत असल्याचे तरूणाने व्हिडीओत नमूद केले आहे. तोहिद मेहमूद शेख (26, कोंढवा) असे सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अरबाज मोहम्मदअली मेमन याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तोहिद यांची पत्नी यांनी फिर्याद दिली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, आज मी आत्महत्या करणार आहे. याचे कारण आहे. अरबाज मोहम्मंद अली ज्याच्याकडे मी काम करत होतो. त्याने मला खुप टॉर्चर केले. माझी काही चुकी नसताना त्याने मला अपमानित करत माझ्या सासरच्यांसमोर मला आई-बहीणीवरून शिव्या दिल्या. मला त्यांनी जीवे मारण्याचीही धमकी दिली. अरबाज अली हा खूप बेकार माणूस असून तुम्ही कोंढव्यातील कोणत्याही कामगाराला जाऊन विचारा तो कसा व्यक्ती आहे ते ? तो कोणा कोणाला कशा शिव्या देतो याची माहिती तुम्हाला मिळेल. त्यानंतर त्याने मला तू पोलिस आयुक्तांकडे जा नाहीतर कुठेही जा माझे कोणी काही करून शकत नसल्याबाबत धमकावल्याचे व्हिडीओत नमूद करण्यात आले आहे.

काय सांगू तुम्हाला म्हणत हा व्हिडीओ चित्रीत करून व्हिडीओच्या शेवटी यासाठी अल्लाह मला माफ कर म्हणत त्याने आत्महत्या केली. बिल्डरच्या त्रासाला कंटाळून तोहिद याने गुरूवारी सकाळी कौसर बाग येथील गॅलेक्स प्रीमियम या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डरवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनेची माहिती मिळताच बिल्डर फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

2 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

6 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago