अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाबाबत सरकारनं पॉक्सोसारखा कडक कायदा केला असला, तरी समाजात अजूनही हे गुन्हे घडतच आहेत. न कळत्या वयातही मुलींना अशा अत्याचाराला सामोरं जावं लागत आहे. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात नर्सरीत शिकणाऱ्या 2 मुलींवर व्हॅन चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर योग्य कारवाई केली जात असल्याचं सांगितलंय.
बेगुसराय इथल्या वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेच्या व्हॅन चालकाने नर्सरीत शिकणाऱ्या 4 ते 5 वर्षांच्या मुलींवर अत्याचार केला. इतकंच नाही, तर त्याने या घटनेचा व्हिडिओसुद्धा तयार केल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.मुलींची शाळा सुटल्यावर घरी येताना व्हॅन चालकाने हा प्रकार केला. वर्दळ नसलेल्या ठिकाणी व्हॅन घेऊन जाऊन त्याने 2 मुलींवर अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्या मुलींना त्यांच्या घरीही सोडलं. घरी पोहोचल्यावर रक्तानं माखलेल्या त्या मुलींकडे पाहून घरच्यांनी दोघींची चौकशी केली तेव्हा घडलेला प्रकार समोर आला.
हे कळल्यावर एका मुलीच्या कुटुंबीयांनी पळून जाणाऱ्या चालकाला ग्रामस्थांच्या मदतीने पकडलं. त्यानंतर पोलीस व इतरांना या गोष्टीची माहिती मिळाली. दोन्ही मुली एकाच गावात जवळच्या भागात राहतात. दोघीही 4 ते 5 वर्षांच्या आहेत व एका खासगी शाळेत नर्सरीमध्ये शिकतात.पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. तो शाळेची मॅजिक व्हॅन चालवतो. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बडी एघु गावचा तो रहिवासी असून, सिकंदर राय असं त्याचं नाव आहे. गेल्या 3 वर्षांपासून ते शाळेची व्हॅन चालवायचा. मंगळवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी सातच्या सुमाराला वीरपूर पोलिसांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती मिळाल्याचं पोलीस उपअधीक्षक अमित कुमार यांनी सांगितलं. त्यानंतर ताबडतोब स्टेशन प्रभारी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…