डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले आहे. विभागस्तरावरील या स्पर्धे मध्ये कर्मयोगी च्या पुरुष व महिला संघाने सलग दुसर्या वर्षी विजेता होण्याचा मान मिळविला आहे. सदरच्या स्पर्धेचे आयोजन एमडीए फार्मसी कॉलेज लातूर येथे करण्यात आले होते.
आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये कर्मयोगी अभियांत्रिकीच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात फॅबटेक इंजिनिरिंग कॉलेज सांगोला संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर कर्मयोगीच्या महिला संघाने व्हीडीएफ लातूर संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील शिक्षणा बरोबरच शारीरिक शिक्षणाचे ही प्रशिक्षण दिले जाते व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून घेण्यात येणार्या विविध क्रीडास्पर्धेत मध्ये मिळालेल्या यशातून दिसून येत आहे याचे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. वरील सर्व क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. गणेश बागल यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख श्री गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…