ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आईची ‘चविष्ट जेवण न दिल्याने’ भांडण करून हत्या केली. मुरबाड तालुक्यातील वेळू गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. घरगुती कारणावरून आई आणि मुलामध्ये अनेकदा भांडण होत असे.
एफआयआरचा हवाला देत पोलिसांनी सांगितलं की, रविवारी आरोपीचं त्याच्या आईशी पुन्हा एकदा भांडण झालं. मुलाने तक्रार केली की आई त्याच्यासाठी चवदार जेवण बनवत नाही. अधिकाऱ्याने सांगितलं की, रागाच्या भरात आरोपीने त्याच्या आईच्या मानेवर विळ्याने हल्ला केला, ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर आरोपीनी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्या. नातेवाइकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ते म्हणाले की, सोमवारी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…