तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसन नलिकेत फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाडा तालुक्यात ही घटना घडली असून हर्ष बुधर असे मृत तीन वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भगतपाडा या दुर्गम भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारा हर्ष बुधर हा तीन वर्षांचा चिमुकला आपल्या मित्रांसोबत अंगणात खेळत होता. मात्र, खेळ खेळत असताना अचानक हर्षची तब्येत बिघडली. चिमुकल्याची तब्येत अचानक बिघडल्याने हर्षचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. खेळता खेळता हर्षला नेमके काय झाले? तो कुठे पडला का? त्याला काही लागलं का? अशी विचारणा हर्षच्या कुटुंबीयांनी हर्षसोबत खेळत असलेल्या त्याच्या मित्रांकडे केली.
यावेळी हर्षने खेळता खेळता फुगा गिळल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. हर्षने फुगा गेल्याचे त्याच्या कुटुंबीयांना कळताच कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनतर हर्षला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच रबरचा असलेला हा फुगा हर्षच्या श्वसन नलिकेत अडकल्याने रुग्णालयात त्याला दाखल करण्याआधीच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या चिमुकल्याला मृत घोषित केले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…