ताज्याघडामोडी

संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; विद्यार्थ्यासोबत वाढदिवसाच्या पार्टीत घडली भयंकर घटना

कानपूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. कानपूरच्या डेन्टल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह वसतीगृहात आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. विद्यार्थ्याचा वडिलांनी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचा आरोप केला आहे.

मीडिया वृत्तानुसार, कानपूरमधील बिठूर पोलीस स्टेशनच्या रामा डेन्टल कॉलेजमध्ये ही घटना घडली. रविवारी हॉस्टेलच्या एका रुममध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. साहित सारस्वत असं या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. २४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह हा शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.

विद्यार्थ्याच्या वडिलांचा आरोप आहे की, साहिलच्या डोक्याला दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत. मृतदेहावरही कापले गेल्याच्या खुणा आहेत. आपपासातील वादामुळे साहिलची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. तसेच त्याच्या वडिलांनी पोलिसांनी व्यवस्थित तपास न केल्याचा आरोप केला आहे. मृत विद्यार्थ्याचे वडील मथुरा येथे शाळेची बस चालवतात. साहिल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत अर्ज दाखल केला आहे. साहिलच्या मृत्यूने साहिलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

11 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago