ताज्याघडामोडी

बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला; शिक्षणसंस्था चालकांच्या घरात शिरला, महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावली अन्…

बडतर्फ शिक्षकाने घरात घुसून तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. या घटनेने संतप्त नागरिकांनी संबंधीत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात शिक्षकही जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी शिक्षकाची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग मार्गावरील नवीन नंदनवन येथे घडली.

संजीवनी आनंद जिभकाटे (६२) आणि नितीन सुरेश येरकर (४०, रा. वडगाव रोड, यवतमाळ), अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे आनंद जिभकाटे यांची गांधी विद्यालय नावाने शिक्षण संस्था आहे. नितीन हा संस्थेत शिक्षक असताना विद्यार्थ्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार केली. २०१९मध्ये चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने नितीनला दोषी ठरवत बडतर्फ करण्याची शिफारस केली. त्यानंतर नितीनला बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ झाल्याने नितीन हा संतापला. त्याने शाळेविरुद्ध तक्रारी करण्यास सुरुवात केली. मात्र कारवाई होत नसल्याने नितीनचा संताप वाढला.

काही दिवसांपूर्वी नितीन हा नागपुरात राहणाऱ्या भावाकडे आला. शुक्रवारी दुपारी नितीन हा जिभकाटे यांच्या नवीन नंदनवन येथील घरात घुसला. यावेळी संजीवनी या घरी एकट्या होत्या. लोखंडी रॉड दाखवून त्याने संजीवनी यांना ठार मारण्याची धमकी दिली. संजीवनी घाबरल्या. त्यानंतर नितीनने त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी चिटकवली. ‘काहीही चूक नसताना मला बडतर्फ केले. आता बघा मी काय करतो’, असे म्हणत नितीनने लोखंडी रॉडने संजीवनी यांच्या दोन्ही हातावर वार केले. याचदरम्यान संजीवनी यांची बहीण आली. घडलेला प्रकार बघून तिही घाबरली. संजीवनी यांच्या बहिणीने आरडाओरड करताच शेजारी जमले.

संजीवनी यांची अवस्था बघून संतापलेल्या शेजाऱ्यांनी पकडून नितीनला चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यान एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राऊत यांच्यासह नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून नितीनची सुटका केली. संजीवनी आणि नितीन या दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर डॉक्टरांनी नितीनला सुटी दिली. पोलिसांनी गंभीर दुखापतीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून नितीनला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नितीनची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. संजीवनी यांच्यावर सक्करदऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago