बीडमधून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बीडच्या लोणगावमध्ये एका तरुणाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. नातवाने ७२ वर्षीय आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आली आहे. कौशल्याबाई किसन राऊत असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नातू राहुल बाळासाहेब राऊत वय २९ याच्याशी घरात किरकोळ कारणावरून आजीचा वाद झाला होता. पुढे या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे नातवाला आजीचा खूप राग आला. त्याने याचा राग मनात धरून आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी नातवाविरोधात दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातही काल अशीच एक घटना समोर आली. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केली. भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारहाण करत हत्या केली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवी परिसरात ही घटना घडलीये. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…