आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली माहिती
कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरात आलेल्या वारकरी भाविकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच ६५ एकर येथील महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासण्या व उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य विभागाकडून ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी तसेच महाआरोग्य शिबिरच्या माधमातून १ लाख २५ हजार ५२ वारकरी-भाविकांनी मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार यांनी दिली.
कार्तिकी वारी 2023 साठी आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून वारी कालावधीत आरोग्य विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी मोफत आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या तसेच ६५ एकर येथे २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ६५ येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून ७० हजार ८०२, तर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ७ हजार ४४४, शहरातील ११ औषध उपचार केंद्राच्यामाध्यमातून ५ हजार ५६१, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून २ हजार ३६६, उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ५ हजार ५४५, अति दक्षता विभागाच्या माध्यमातून ११ हजार ६७५, आरोग्य दुतांकडून १८ हजार ८०१ तसेच १०८ रुग्णवाहिका यांच्या माध्यमातून २ हजार ८६१ वारकरी भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
कार्तिक वारी महाआरोग्य शिबीरामध्ये २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत वारकरी भाविकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उच्च तज्ञ डॉक्टर्स, विविध विभागातील मोठमोठ्या रूग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ, आरोग्य विभागामार्फत 1 हजार 992 व भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून 1000 असे 2 हजार 992 अधिकारी -कर्मचारी उपलब्ध करण्यात आले होते. या महाशिबिरातून नेत्रविकार, हृदयरोग, किडणी, पोटाचे, त्वचेचे विकार, दंतरोग, संसर्गजन्श् रोग, कॅन्सर यासारख्या रोगांवर मोफत उपचार करण्यात आले. तसेच ज्या वारकऱ्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नेत्र विभागा मार्फत 18 हजार 637 जणांची तपासणी करण्यात आली असून 15 हजार 496 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ.पवार यांनी सांगितले.
शिबिराच्या ठिकाणी ५ बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत होते, त्यामध्ये ६६ रुग्णांना सेवा दिली व वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात आले. शिबीरामध्ये अवयव दान आणि नेत्रदान याबाबत ५७ नागरिाकंचे समुपदेशन करण्यात आले. यामध्ये तीन अवयव दान, नेत्रदान ९ तर देहदान एक अशी नोंदणी करण्यात आली. महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार आणि निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी आलेल्या वारकरी भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते असेही आरोग्य उपसंचालक डॉ.पवार यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…