ताज्याघडामोडी

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, विश्वस्तांकडून १ कोटीची खंडणी, कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई

आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. तसेच तिची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. या प्रकरणातील संशयित सारिका बापूराव सोनवणे (४२) हिने दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त यांच्याकडे दहा लाखाची खंडणी मागितली होती. पैसे घेताना सारिका सोनवणेसह तिचा मुलगा मोहित बापूराव सोनवणे (२५) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या घटनेनंतर कृषी सहसंचालकांनी सारिका सोनवणे यांच्या निलंबनाचा आदेश काढला असून तिची चौकशी केली जाणार आहे.

स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यावरुन वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ केले जात होते. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी रुपयांची खंडणी संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. दरम्यान संशयित सारिका सोनवणे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार असून सेवा काळात कोणा – कोणाची फसवणूक केली आहे का? याची देखील चौकशी आता कृषी विभाग करणार असल्याची माहिती मिळाली आहे. निलंबित सारिका सोनवणे हिच्यासह तिचा भाऊ विनोद चव्हाण, मुलगा मोहित यांना न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित सारिका सोनवणे नाशिक जिल्हयातील निफाड येथे कृषी सहायक अधिकारी म्हणून कार्यरत होती. गेल्या ४ ऑक्टोबरपासून ती वैद्यकीय रजेवर होती. खंडणीप्रकरणी गेल्या शनिवारी (ता.१८) तिला आणि तिच्या मुलाला अटक झाली होती. आता कृषी विभागाने सारिका सोनवणे हिचं निलंबन केलं असून कृषी विभागात सेवा करत असताना कोणा कोणाची फसवणूक केली होती का ? याची देखील आता चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago