मटण खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली.
अंकित इंगोले (वय २८ वर्ष) असं हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे. तर रमेश इंगोले असं गंभीर जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण इंगोले (वय ३२ वर्ष) याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलचा सामना सुरू होता. आरोपी प्रवीण त्याचा अंकित भाऊ आणि रमेश तिघेही टीव्हीसमोर बसून मॅच पाहत होते. दरम्यान, आरोपीचे वडील आणि लहान भावाने रात्रीच्या जेवणात मटन खाल्ले.
जेवणानंतर ते हॉलमध्ये आले असता, आरोपी प्रवीणने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही मटण खाऊन टीव्हीजवळ आले म्हणून भारत मॅच हरला, असं म्हणत आरोपीने वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. वडिलांना वाचविण्यासाठी आरोपीचा लहान भाऊ अंकित मध्यस्थी आला.
तेव्हा आरोपीने त्याला देखील लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अंकितचा जागीच मृत्यू झाला. तर वडील रमेश गंभीर जखमी झाले. दरम्यान, घरात सुरू असलेली आरडाओरड पाहून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी आरोपी प्रवीणला पकडून ठेवले आणि त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले. आरोपीच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असून अंकितचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रवीणला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…