ताज्याघडामोडी

लग्नाला दिला नकार, तरुणाने मुलीच्या कुटुंबावरच केला गोळीबार

छठपूजा करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर बेछूट गोळीबार करण्यात आला. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली. छठ घाटावरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

धक्कादायक घटना पंजाबी मोहल्लामध्ये घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली. या हल्ल्यात 6 जण जखमी झाले आहेत. त्यांना बेगुसराय इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तीन गंभीर जखमींना पाटणा पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आलं आहे.

लखीसराय एसपीच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याचं सांगितलं जात आहे. आशीष चौधरी नावाचा युवक त्याच्याच घरासमोर राहणाऱ्या मुलीवर प्रेम करत होता आणि तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट त्याने धरला होता.

आशीषशी लग्न करुन देण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याचा राग येऊन आज त्याने मुलीच्या कुटुंबावर गोळीबार केला. काही दिवसांपूर्वीही आशिष चौधरीचा या कुटुंबाशी वाद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी गोळीबार केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago