ताज्याघडामोडी

मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन

मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं वडिलांनी रागवल्यानं 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं यापूर्वीही गेम खेळण्यापासून रोखल्यास स्वत:चं नुकसान करण्याची धमकी घरच्यांना दिली होती. या मुलाला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन होतं. गुरुवारी रात्री वडिलांनी त्याला शिवीगाळ करुन त्याचा फोन हिसकावून घेतला. यानंतर शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास कुटुंबीयांना त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. वडिलांनी तात्काळ मुलाला खासगी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात पाठवण्यात आला आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. मालवणी पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले आहेत. क्षुल्लक कारणामुळं 16 वर्षीय मुलानं आपला जीव संपवल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडिलांनी आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच मोबाईलवर गेम खेळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उलटच घडलं. कुटुंबीयांना मुलाच्या आत्महत्यामुळं धक्का बसला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago